उडत्या पाखरांनापरतीची तमा नसावीनजरेत सदानवी दिशा असावीघरट्याचे काय आहेबांधता येईल केव्हा ही क्षितीजांच्याही पलीकडेझेप घेण्याची जिद्द असावी ....समरभूमिचे सनदी मालक शतयुद्धांचे मानकरीरणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ध्रु.
घोरपडीला दोर लावुनी पहाड़ दुर्घट चढलेले,तुटून पङता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले,खंदकांतल्या अंगारावर हासत खेळत पडलेले,बाप असे कळिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी,रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? १
या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची,दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची,पहाड़ डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची,जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदा शिरी,रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? २
करवत कानस कुणी चालतो पिकवो कोणी शेतमळा,कलम कागदावरी राबवो धरो कुणी हातात तुळा,करात कंकण असो कुणाच्या वा भाळावर गंधतिळा,शिंग मनोय्रावरी वाजता उभी छावणी घरोघरी,रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ३
